२३ व्या मजल्यावरून पडल्याने बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

ग्रेटर नोएडामध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
ग्रेटर नोएडा,
Father and son die after falling ग्रेटर नोएडा वेस्ट येथील महागुन मायवूड्स सोसायटीत (गौर सिटी-२) शुक्रवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना समोर आली आहे. सोसायटीच्या टॉवर-२३ च्या २३ व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे एका ४० वर्षीय पित्याचा आणि त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाचा वेदनादायक मृत्यू झाला. मृतांची ओळख ४० वर्षीय रणदीप पात्रा आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा आरव अशी झाली आहे. घटनेनंतर तात्काळ दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
 
 
34547
 
 
मृत रणदीप पात्रा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबाला सकाळी लवकर खाटू श्याम मंदिराच्या दर्शनासाठी जायचे होते. याच कारणामुळे रणदीप हे आपल्या मुलासह पूजेसाठी फुले तोडण्याकरिता बालकनीत गेले होते. पावसामुळे बालकनीमध्ये मोठ्या प्रमाणावर निसरडेपण आले होते. प्राथमिक माहितीनुसार, बालकनीत फुले तोडताना शिडीवरून पाय घसरल्याने ही भीषण दुर्घटना घडली. बालकनीत असलेल्या निसरड्या जागेमुळे आधी मुलाचा पाय घसरला आणि तो बालकनीतून खाली लटकू लागला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पित्याचाही तोल गेला आणि दोघेही २३ व्या मजल्यावरून थेट खाली कोसळले.
 
 
या घटनेमुळे संपूर्ण महागुन मायवूड्स सोसायटीत शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बिसरख ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुर्घटनेच्या सर्व परिस्थितीची पोलीस सखोल चौकशी करत असून या प्रकरणात इतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.