वाशीम,
raje-vakataka-library येथील ऐतिहासिक राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘गुणाढ्य व्याख्यानमाले’ला शनिवार, ३१ ऑटोबरपासून प्रारंभ होत आहे. ज्ञान, संस्कृती आणि वैचारिक प्रबोधनाची परंपरा जपणार्या या व्याख्यानमालेत यंदा दोन वेगवेगळ्या विषयांवर मान्यवर वक्त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शनिवार, ३१ ऑटोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता गुंफले जाणार आहे. कारंजा येथील डॉ. सुशील देशपांडे हे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग : जीवन जगण्याची अभिनव कला’ या विषयावर विचार मांडणार आहेत. बदलत्या जीवनशैलीत सकारात्मक दृष्टिकोन, मानसिक स्वास्थ्य आणि जीवन जगण्याची कला या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी द्वितीय पुष्पात नागपूर येथील सुनील किटकरू हे ‘पूर्वांचल : सांस्कृतिक जीवनदर्शन, समस्या आणि समाधान’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या राज्यांचे सांस्कृतिक जीवन, तेथील विविधता, समस्या आणि त्यावरील उपाययोजना या विषयांचा वेध या व्याख्यानातून घेतला जाणार आहे.
दोन्ही व्याख्याने राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ६.३० ते ८ या वेळेत होणार असून कार्यक्रमांना वेळेवर प्रारंभ होईल. वाशीमच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ साहित्यप्रेमी, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहकुटुंब व इष्टमित्रांसह उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.