मुंबई,
jio-adds-a-large-number-of-customers शेअर बाजारातील दमदार पदार्पणानंतर रिलायन्स जिओसाठी मोबाइल ग्राहकांच्या आघाडीवरही आनंदाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सप्टेंबर महिन्यातील अहवालावर आधारित डीएएम कॅपिटल आणि आयआयएफएल कॅपिटलच्या विश्लेषणानुसार, ‘मशीन-टू-मशीन’ कनेक्शन वगळल्यानंतर जिओच्या मोबाइल ग्राहकसंख्येत १९ लाखांची वाढ झाली. देशातील या श्रेणीतील मोबाइल ग्राहकसंख्येत एकूण २२ लाखांची वाढ झाली असून, त्यातील जवळपास ८६ टक्के वाटा एकट्या जिओचा आहे.
सक्रिय मोबाइल ग्राहकांच्या बाबतीतही जिओने दमदार कामगिरी केली. डीएएम कॅपिटलच्या अहवालानुसार, ‘मशीन-टू-मशीन’ कनेक्शन वगळून केलेल्या गणनेत सप्टेंबर महिन्यात जिओच्या सक्रिय ग्राहकसंख्येत १३ लाखांची वाढ झाली. ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरअखेर जिओचे ५१.११ कोटी मोबाइल ग्राहक होते, तर एअरटेलचा ग्राहकवर्ग ४९.४३ कोटी होता. व्होडाफोन आयडियाचे २०.०१ कोटी, तर सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे ९.४३ कोटी मोबाइल ग्राहक होते. या एकूण ग्राहकसंख्येत ‘मशीन-टू-मशीन’ कनेक्शनचाही समावेश आहे.