महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच!

मृत्यूंचा आकडा २० हजारांपार

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
मुंबई,
maharashtra-road-accident-deaths-2026महाराष्ट्रात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक असून, जानेवारी ते सप्टेंबर 2026 या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल 11,326 जणांच्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलिसांच्या रस्ते विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूंच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली असली, तरी अपघातांमधील जीवितहानी अद्याप मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
road accident
 
2025 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात रस्ते अपघातांमध्ये 11,912 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2026 मध्ये याच कालावधीत 11,326 जणांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूंची संख्या 586 ने कमी झाली आहे. मात्र, नऊ महिन्यांत 11 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू होणे ही गंभीर बाब आहे.
 
आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2026 या काळात महाराष्ट्रात एकूण 26,915 रस्ते अपघातांची नोंद झाली. यापैकी 10,444 अपघात प्राणघातक ठरले. या अपघातांमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि रस्त्यांवरील असुरक्षित परिस्थिती ही अपघातांची महत्त्वाची कारणे ठरू शकतात.
 
मुंबईतही रस्ते अपघातांची परिस्थिती चिंताजनक आहे. नऊ महिन्यांत शहरात 248 प्राणघातक अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये 260 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.