१२ तासांत ३ राशींवर पडणार पैशांचा पाऊस

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
Money will rain down on 3 zodiac signs ज्योतिष शास्त्रामध्ये बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रहाला धन, ज्ञान, भाग्य, विवाह आणि समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी अवघ्या १२ तासांत गुरु ग्रह मघा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मघा नक्षत्राचा स्वामी केतू ग्रह मानला जात असल्याने या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्वच १२ राशींवर पाहायला मिळणार आहे. मात्र, ज्योतिषीय मान्यतेनुसार या संक्रमणाचा ३ विशेष राशींच्या करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर अत्यंत शुभ व सकारात्मक प्रभाव पडणार असून या राशींच्या लोकांच्या जीवनात राजासारखे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
 
gfh678770
 
या नक्षत्र परिवर्तनाचा सर्वाधिक शुभ लाभ वृषभ, सिंह आणि तूळ या तीन राशींना मिळणार आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या सुख-समृद्धीत व वैवाहिक जीवनात महत्त्वाचे चांगले बदल घडतील, तसेच नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी सन्मान मिळून त्यांच्या कामाचे कौतुक केले जाईल. सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण शुभकारक ठरणार असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल, करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल; मात्र कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
 
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी आणि अनुकूल ठरणार आहे. या काळात नोकरीत पदोन्नतीच्या (प्रमोशन) अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील तसेच नवीन लोकांशी भेटीगाठी वाढतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होऊन नवीन योजनांचा लाभ घेता येईल. आगामी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच घडणारे हे ग्रहांचे संक्रमण या तीन राशींच्या जातकांसाठी आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवीन दार उघडणारे ठरेल.