स्वामी समर्थांच्या अर्धनारीश्वर रूपात निवेदिता सराफ

    दिनांक :30-Oct-2026
Total Views |
मुंबई,
nivedita-saraf-swami-samarth-lookमराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही खास छायाचित्रांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या छायाचित्रांमध्ये त्या श्री स्वामी समर्थ यांच्या अर्धनारीश्वर रूपातील विशेष वेशभूषेत दिसत आहेत. त्यांचा हा वेगळा आणि भक्तिभावाने सजलेला लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
 

saraf 
हे फोटो शेअर करताना निवेदिता यांनी, “अशक्य ही शक्य करतील स्वामी… स्वामींच्या इच्छेनेच हा दिव्य लूक साकारण्याचं भाग्य लाभलं… खरंच धन्य वाटतंय!” असे भावूक शब्द लिहिले आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तेजस्वी रूप”, “अतिशय दैवी लूक”, “अंगावर अक्षरशः काटा आला” अशा शब्दांत चाहत्यांनी त्यांच्या रूपाचे कौतुक केले आहे.
 
नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या निवेदिता सराफ सध्या झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्या अभिनयासोबतच या खास लूकचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.