चंद्रपूर
unity-parade लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त गुजरात राज्यातील एकता नगर (केवडीया) येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात 31 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित राष्ट्रीय एकता परेड सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक, विद्यार्थी, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरातला रवाना झाले आहे.
देशाची एकात्मता, सार्वभौमत्व आणि अखंडतेचा संदेश देणार्या या ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने पूर्वी नक्षल प्रभावित राहिलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. या उपक्रमांर्तगत चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम व संवेदनशील भागातील 50 नागरिकांचा समावेश असलेले हे विशेष शिष्टमंडळ गुजरात दौर्यावर जात आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या समन्वयातून पोलिस निरीक्षक निशीकांत रामटेके व पथकाने प्रतिनिधी मंडळाच्या गुजरात येथील या अभ्यास व प्रेरणा दौर्याचे नियोजन केले. प्रतिनिधी मंडळातील पहिल्या टप्प्यात 26 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर नियंत्रण कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगळे यांच्यासोबत 3 नागरिकांना तसेच 29 ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्यासोबत 33 नागरिकांना आणि 30 ऑक्टोबर रोजी पोलिस उप निरीक्षक मनोज नाले यांच्यासोबत 14 नागरिकांना गुजरात येथील एकता नगर येथे रवाना करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील एकूण 50 नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळासोबत चंद्रपूर येथील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे एक विशेष समन्वय पथक तैनात करण्यात आले असून, नागरिकांच्या प्रवास, निवास व सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून रवाना करण्यात आलेले 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ 31 ऑक्टोबरच्या मूख्य सोहळ्यापूर्वी सरदार सरोवर प्रकल्प, एकात्मका संकुल आणि गुजरात परिसरातील विविधी विकास प्रकल्पांना भेट देणार आहे.