अभिनेत्री शितल उपरेचा अमित सिंघ यांच्याशी साखरपुडा

डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार?

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मुंबई
Sheetal Upare अभिनेत्री आणि ‘मिस हेरिटेज इंटरनॅशनल’ किताबाची मानकरी शितल उपरे हिच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. शितलने अमित सिंघ यांच्याशी साखरपुडा केला असून, या खास सोहळ्यातील काही सुंदर क्षणांचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अमित यांनी केलेल्या रोमँटिक प्रपोजलच्या फोटोंनी सध्या चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
 

Actress Sheetal Upare Gets Engaged to Amit Singh, Wedding Expected in December 2026 
शितलने शेअर केलेल्या छायाचित्रांमधून या दोघांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांची झलक पाहायला मिळते. अमित यांचे प्रेमळ प्रपोजल आणि त्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवतो. साखरपुड्याची बातमी समोर येताच चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील तिच्या मित्रमंडळींनीही शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
शितल उपरे हिची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून Sheetal Upare  मर्यादित नाही. चित्रपट, टेलिव्हिजन आणि रंगभूमी अशा विविध माध्यमांत तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. लोकप्रिय अ‍ॅनिमेटेड मालिका ‘द लिजेंड ऑफ हनुमान’मध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. याशिवाय ती इमोशनल वेलनेस कोच म्हणून कार्यरत असून, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने सिंगापूर एअरलाइन्समध्ये केबिन क्रू म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. ‘मिस हेरिटेज इंटरनॅशनल’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावल्यामुळेही तिची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार शितल आणि अमित यांचा विवाह डिसेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. मोजक्या आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे समजते. साखरपुड्यानंतर आता या जोडीच्या विवाहसोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.