मानोरा,
adan-dam-turmeric-farmers-protestअडाण धरणातून हळद पिकासाठी पाणी आणि तोडलेले वीज कनेशन पूर्ववत जोडा, या मागणीसाठी इंजोरी, जामदारा व तोरणाळा परिसरातील हळद उत्पादक शेतकर्यांनी २९ ऑटोबर रोजी दुपारी कारंजा - मानोरा राज्य महामार्गावर, इंजोरी जवळील धामणी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या आंदोलनाची दखल घेत मानोरा तहसील प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन शेतकर्यांचे निवेदन स्वीकारले. लेखी आश्वासनानंतर शेतकर्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले असले तरी, पाणी व वीज पूर्ववत करण्याची आपली मागणी कायम ठेवल्याचे शेतकर्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही खरीप हंगामात हळद व तूर पिकाची लागवड केली. हळद या एका पिकाला एकरी २ लाख रुपयांपर्यंत खर्च झाला आहे. यावर्षी कापूस आणि सोयाबीन हे पीक पूर्णतः हातचे गेले आहे. आमची आशा केवळ हळद पिकावर टिकून आहे. अडाण प्रकल्पामुळे आमच्या जमिनी गेल्या, जामदारा व तोरणाळा गावाचे पुनर्वसन झाले, तरी आम्हाला पाणी मिळत नाही. महावितरणने आमचे वीज कनेशन तोडले आहेत. शेतकर्यांनी प्रशासनाला सांगितले की, अडाण प्रकल्पात सध्या पाणी साठा उपलब्ध आहे.
या साठ्यातून पाणी आठवड्यातून २ दिवस आळीपाळीने दिले तरी हजारो एकर हळद-तूर पीक वाचू शकते. २७ ऑटोबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने रास्ता रोको करण्यात आला. घटनास्थळी मानोरा तहसीलचे अधिकारी, पोलिस प्रशासन उपस्थित होते. अधिकार्यांनी शेतकर्यांचे म्हणणे वरिष्ठ पातळीवर जिल्हाधिकारी वाशीम, उपविभागीय अधिकारी कारंजा आणि अडाण पाटबंधारे विभाग व महावितरणकडे तातडीने पाठवून पाणी व वीज प्रश्नावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकरी नेते जगदीश आरेकर, आकाश हळदे, पंकज कारेकर आणि इतर ग्रामस्थांनी तूर्तास आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.