बुलढाणा
prataprao-jadhav जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करून भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईसाठी आरक्षित ठेवण्यात येणार्या पाण्याव्यतिरिक्त शिल्लक राहणारे पाणी खरीप हंगामातील तूर, कपाशी व हळद या पिकांना एक वेळ सिंचनासाठी देण्यास जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच पशुधनाच्या चार्यासाठीही प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यासाठी पुढाकार घेत प्रशासन आणि शेतकर्यांमध्ये समन्वय साधत शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदा अपुर्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतांमधील पिके पाण्याअभावी उभी वाळली आहेत, तर काही ठिकाणी शेतकर्यांना उत्पादन खर्चही भरून निघण्याची परिस्थिती नाही. अशा स्थितीत तूर, कपाशी आणि हळद या पिकांना एक वेळ पाणी मिळाल्यास पिके काही प्रमाणात तग धरून उत्पादन देऊ शकतील, अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली होती.
यासंदर्भात जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत ना. प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्यासह संबंधित अधिकार्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज, पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रकल्पातील पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट आणि त्याव्यतिरिक्त दहा टक्के अतिरिक्त पाणीसाठा राखीव ठेवून उर्वरित पाण्याचा शेतीसाठी वापर करता येईल का, याची चाचपणी करण्याचे निर्देश ना. जाधव यांनी अधिकार्यांना दिले होते. त्यानुसार प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण करून पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले. या नियोजनानंतर पिण्याच्या पाण्यासह भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईसाठी आवश्यक साठा सुरक्षित ठेवून शिल्लक राहणार्या पाण्यातून खरीप पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे शय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तूर, कपाशी, हळद तसेच पशुधनाच्या चार्यासाठी प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यास प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
प्रकल्पातून उपलब्ध होणार्या पाण्याचा शेतकर्यांनी काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करावा. हे पाणी केवळ सध्याच्या खरीप पिकांना व चार्याची गरज भागविण्यासाठी वापरावे. रब्बी हंगामातील पिकांसाठी या पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. अपुर्या पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांच्या पाठीशी प्रशासनाच्या माध्यमातून उभे राहण्याचा आणि उपलब्ध जलसाठ्याचा योग्य विनियोग करून खरीप पिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निर्णयातून करण्यात येत आहे.