‘कांटे’चे दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

वयाच्या ५७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
मुंबई
Sanjay Gupta बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक संजय गुप्ता यांचे ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील राहत्या घरी पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट अ‍ॅट वडाळा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
 

Sanjay Gupta 
मिळालेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास संजय गुप्ता घरात पडले होते. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी पत्नी आणि दोन मुलेही घरी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नेमकी घटना कशी घडली आणि त्यानंतर काय झाले, याबाबत अद्याप सविस्तर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले.
अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल Sanjay Gupta  आर. खान यांनीही संजय गुप्ता यांना श्रद्धांजली वाहिली. संजय यांच्याकडे प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान होते. चित्रपट आणि बॉलिवूडविषयी त्यांना उत्तम माहिती होती, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.संजय गुप्ता यांनी १९९४ मध्ये ‘आतिश’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांटे’ या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, कुमार गौरव आणि लकी अली यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दमदार संवाद, प्रभावी अ‍ॅक्शन दृश्ये आणि गुन्हेगारी विश्वाचे वेगळ्या शैलीत केलेले चित्रण यामुळे ‘कांटे’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
त्यानंतर त्यांनी ‘शूटआउट अ‍ॅट लोखंडवाला’, ‘शूटआउट अ‍ॅट वडाळा’, ‘जज्बा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांमधून आपली दिग्दर्शनाची छाप उमटवली. हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काबिल’ हा चित्रपटही विशेष गाजला. मुंबईतील गुन्हेगारी विश्व, अंडरवर्ल्ड, सूड आणि मैत्री यांसारखे विषय प्रभावीपणे पडद्यावर साकारण्याची त्यांची खास शैली होती. अ‍ॅक्शन आणि क्राइम थ्रिलर चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई प्रवासादरम्यान संजय गुप्ता एका गंभीर अपघातातून बचावले होते. या अपघातात त्यांना अनेक दुखापती झाल्या होत्या. मात्र, उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी अनु लेखी यांच्याशी विवाह केला होता. काही काळानंतर दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, २००९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांशी विवाह केला होता.क्राइम, अ‍ॅक्शन आणि गँगस्टरपटांना स्वतःची वेगळी शैली देणाऱ्या संजय गुप्ता यांच्या निधनाने बॉलिवूडने एक अनुभवी दिग्दर्शक गमावला आहे.