मंगरूळनाथ,
died-due-to-a-lightning-strike तालुयातील तांदळी येथील शेतात काम करताना वीज पडून मृत्यू झालेल्या राहुल विष्णू राठोड यांच्या वारसांना शासनाकडून चार लाख रुपयांचे आर्थिक अनुदान मंजूर करण्यात आले. मंजूर अनुदानाची रक्कम त्यांच्या पत्नी उषा विष्णू राठोड यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
या अनुदानासंदर्भातील पत्र आमदार शाम खोडे यांच्या हस्ते ३० ऑटोबर रोजी वारसांना प्रदान करण्यात आले. राहुल विष्णू राठोड यांचा २३ सप्टेंबर २०२६ रोजी मौजे तांदळी येथील शेतात काम करत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शासन निर्णयातील निकषांनुसार त्यांच्या वारसांना चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र राठोड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच तालुयातील दाभा येथील विराट राठोड याला दुर्धर आजार असल्याने शासनाच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या मदतीचा धनादेश विराट याचे कुटुंबप्रमुख कनीराम राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.