गांजा, दारूची विक्री करणार्यांच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
वर्धा,
ganja-liquor-seizureहिंगणघाट येथील गोमाजी वार्डातील हर्षल गिमेकर याच्या घरी धाड टाकून १ किलो ११३ ग्रॅम गांजा आणि देशी दारू जप्त केली. ही कारवाई वर्धा गुन्हे शाखेच्या पथकाने २९ रोजी केली. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंमली पदार्थ व दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले आहे. त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणार्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम राबविली असून, २९ रोजी वर्धा गुन्हे पथकाला गोमाजी वार्ड येथे हर्षल गिमेकर याच्या घरी गांजा व दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.
 

gonb 
माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकली असता हर्षलचे वडील विनोद गिमेकर (५२) व त्याचा चुलतभाऊ सूरज चौके (२९), रा. प्रियंका कॉलनी शेगाव नाका अमरावती ह. मु. गोमाजी वार्ड हिंगणघाट हे मिळून आले. घराची झडती घेतला असता गांजा व देशी दारू आढळून आली. अंगझडती दरम्यान दोन मोबाईल मिळून आले. सदर मुद्देमालाबाबत विचारणा केली असता, त्यांनी हा मुद्देमाल त्या तिघांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. तिघेही संगनमताने गांजा व दारूची तस्करी करून विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले.
 
पोलिसांनी जप्ती पंचनामा करून १ किलो ११३ ग्रॅम गांजा, देशी दारू, दोन मोबाईल असा ८७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षल गीमेकर हा फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले, रवी पुरोहित आदींनी केली.