गर्रा-बघेडा,
gobarwahi-police-recover-stolen-goldघरातून चोरीला गेलेले तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गोबरवाही पोलिसांनी हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ फिर्यादीला सन्मानपूर्वक परत केले. गोबरवाही पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
गोबरवाही पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तत्परतेने तपास करून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे ९ ग्रॅम ४४० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ६ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम वजनाच्या सोन्याच्या लांबसर, झुमक्यांची एक जोडी, सोन्याचे ३० मणी तसेच अंदाजे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ५ लाख ५० हजार रुपये आहे.
प्रथम श्रेणी न्यायालय, तुमसर यांच्या आदेशानुसार फिर्यादी सुनीता आनंदाराव गोजम, रा. गोबरवाही, ता. तुमसर, जि. भंडारा यांना दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने परत करण्यात आले.