मुंबई,
gold-silver-rate-todayसणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदीवर लोकांचा भर असतो. आज शनिवार, 31 ऑक्टोबर 2026 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. जर तुम्ही सोने-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात जाण्यापूर्वी आजचे सुधारित दर जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, अमेरिकन डॉलरचे मजबूत होणे आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवण्याचा घेतलेला निर्णय, या सर्व आंतरराष्ट्रीय घटकांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर पाहायला मिळत आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे दर
स्थानिक कर आणि विविध शहरांतील मागणीनुसार दरांमध्ये किरकोळ फरक दिसून येतो. देशातील प्रमुख शहरांमधील प्रति ग्रॅम आणि प्रति किलोचे आजचे भाव:
दिल्ली: 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 13,054 रुपये, 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,240 रुपये तर चांदी प्रति किलो 2,09,900 रुपये आहे.
मुंबई: 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 13,039 रुपये, 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,225 रुपये तर चांदीचा भाव प्रति किलो 2,09,900 रुपये नोंदवला गेला.
चेन्नई: 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 13,039 रुपये, 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,225 रुपये आणि चांदी 2,09,900 रुपये प्रति किलो आहे.
कोलकाता: 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 13,039 रुपये, 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 14,225 रुपये तर चांदीचा दर प्रति किलो 2,09,900 रुपये आहे.
बंगळुरू आणि हैदराबाद: या दोन्ही शहरांत 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13,039 रुपये, 24 कॅरेट सोन्याचा दर 14,225 रुपये आणि चांदीचा दर 2,09,900 रुपये प्रति किलो आहे.