ज्ञानेशकुमारांना हटवण्याची विरोधकांची खेळी!

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |

नवी दिल्ली,
india-alliance-impeachment-gyanesh-kumarमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरुन हटवण्यात यावे तसेच मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे शनिवारी आयोजित प्रतिकात्मक संसदेत करण्यात आली.
 
dhyanesh
 
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्या १० राजाजी मार्ग या निवासस्थानी आयोजित प्रतिकात्मक संसदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या संसदेच्या अध्यक्षस्थानी लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार होत्या. यावेळी काँग्रेस सांसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीतील २१ पक्षांचे नेते उपस्थित होते. मतदार यादीतून नावे वगळल्या गेलेल्या काही लोकांनाही या प्रतिकात्मक संसदेत आमंत्रित करण्यात आले होते.
खडगे यांनी सुरुवातीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव मांडला, तसेच त्यांच्यावर सहा आरोप ठेवले. निवडणूक प्रक्रियेत मतचोरी करण्यात आली, १३ कोटी २० लाखावर मतदारांची नाव मतदार यादीतून वगळण्यात आली, नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी असलेल्या फार्म सहामध्ये एकतर्फी बदल करण्यात आले, ईसीआयनेटच्या माध्यमातून मतदारयादीत बदल करण्यात आले, असे आरोप खडगे यांनी केले. ज्ञानेशकुमार निवडणूक आयोगाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या इशार्यावर चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सात महिनंे आधी इंडिया आघाडीच्या १९३ खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरुन हटवण्यबाबातचा प्रस्ताव दिला होता, पण तो फेटाळण्यात आला, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप खडगे यांनी केला.