मुंबई,
census 2027देशवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारकडून बहुप्रतीक्षित जनगणना 2027 च्या तारखा या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. नेमकी ही प्रक्रिया कधीपासून सुरु होणार आणि संपूर्ण वेळापत्रक काय आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती.
मोजणीला कधीपासून होणार सुरुवात?
मिळालेल्या माहितीनुसाक, केंद्राच्या अधिसूचनेनुसार देशभरात 25 जानेवारी 2027 ते 28 फेब्रुवारी 2027 याच कालावधीमध्ये जनगणना प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यासाठी 1 मार्च 2027 मध्यरात्री 12 वाजता ही संदर्भ तारीख ठरवण्यात आलेली आहे. भारताचे जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी याबाबत अधिकृत अधिसूचना देखील जारी केली.
या टप्प्यात देशामधील बऱ्याच राज्यांमध्ये जनगणना होणार आहे. मात्र काही राज्य यात वगळली गेली आहे. निवडणुका असलेल्या मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश,पंजाब तसेच उत्तराखंड या राज्यामध्ये सध्या जनगणना होणार नाही,अशी माहिती समोर आलेली आहे. तसेच बर्फवृष्टी होणारे भाग असलेल्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्येही जनगणना या कालावधीत होणार नाही. या सर्व भागांसाठी स्वतंत्र तारखा नंतर जाहीर होतील. महत्त्वाचे म्हणजे, यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे.
केंद्राचा डिजिटल प्लॅन काय?
महत्त्वाचे म्हणजे, 10 जानेवारी ते 24 जानेवारी 2027 दरम्यान सरकार हे स्वयं-नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु करणार आहे. त्यानंतर मु्ख्य जनगणना होईल शिवाय 1 मार्च ते 5 मार्च 2027 या दरम्यान माहितीच्या दुरूस्तीसाठी पुन्हा एक फेरी घेतली जाणार आहे,अशी माहिती समोर आलेली आहे.