मानोरा,
chief-minister-shinde तालुयातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरी गड येथील महाराज परिवारातील सदस्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच भेट घेऊन बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सुरू असलेली उपोषणे, वनार्टी आणि पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाच्या तिकीट दराचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला.

पोहरादेवी येथे गोर बंजारा संस्कृती दर्शविणार्या बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाचे तिकीट दर सध्या २०० रुपये आहे. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून भाविक व पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन तिकीट दर २०० रुपयावरून १०० रुपये करण्यात यावा, अशी अनेक दिवसापासूनची मागणी महाराज परिवाराने लावून धरली आहे. ८ ऑटोबर २०२४ रोजीच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटया जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) च्या निघालेल्या शासन निर्णयात अंशतः बदल करण्यात यावा. गोर बंजारा समाजासाठीच मुळात या संस्थेची मागणी करण्यात आली होती. मात्र, या निर्णयात इतर जातींचा समावेश केल्यामुळे गोर बंजारा समाज पुन्हा एकदा लाभापासून वंचित राहत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणासंदर्भात राज्यभर चालू असलेल्या उपोषणांची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. तुटपुंज्या विमुक्त जाती भटया जमाती प्रवर्गामध्ये सुद्धा इतर प्रभावशाली समाजातील नागरिक घुसखोरी करून सामाजिक, शैक्षणिक आरक्षण लाटत असल्याची सुद्धा उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
या शिष्टमंडळात पोहरादेवी, उमरी गड व इतर ठिकाणच्या महाराज परिवारातील कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, शेखर महाराज, यशवंत महाराज, जुगनू महाराज, रायसिंग महाराज, हिंमत महाराज, अभिमान महाराज, मधुकर महाराज, से.नि. प्रा. जगदीश राठोड यांच्यासह महाराज मंडळी उपस्थित होती. पोहरादेवी, उमरी गड येथील महाराजांच्या शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर उपरोक्त सर्व बाबींवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्याची माहिती महाराज परिवाराच्या वतीने प्रस्तुत प्रतिनिधीस देण्यात आली.