सोशल मीडियावरील कमेंट पडली महागात; गोवंश रक्षकावर हल्ला!

गोमांस विक्री आणि गोवंश वाहतुकीची माहिती देण्याच्या बहाण्याने बोलावले दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
नागपूर
Nagpur Cow Vigilante Attacked सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटवरून सुरू झालेला वाद हिंसक हाणामारीत रूपांतरित झाल्याची घटना नागपुरातील पारडी परिसरात घडली. गोमांस विक्री आणि गोवंशाने भरलेल्या वाहनाची माहिती देण्याच्या बहाण्याने हिंदू संघटनेच्या माजी पूर्व नागपूर गोवंश रक्षक प्रमुखाला पारडी परिसरात बोलावून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात युवक जखमी झाला असून, पारडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे (क्रॉस एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत.
 

Nagpur Cow Vigilante Attacked Over Social Media Comment, Two Arrested 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता गोलू ऊर्फ डेंगेश्वर साहू याला एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव राज असल्याचे सांगत गोमांस विक्री आणि गोवंशाने भरलेल्या वाहनाची माहिती देण्याचे सांगितले. त्यानंतर गोलू साहू याला पारडी येथील यशोदा फरसानजवळ बोलावण्यात आले.
गोलू साहू हा आपला साथीदार Nagpur Cow Vigilante Attacked वीर अमरसिंग वर्मा याच्यासह घटनास्थळी पोहोचला. तेथे आलेल्या दोघांनी त्यांना पारडीतील एका मशिदीजवळ गोमांस विक्री होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर आरोपींनी फोन करून आपल्या ८ ते १० साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच तेथे आलेल्या लोकांनी दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण सुरू केली, असा आरोप आहे.हल्लेखोरांनी दोघांना वाहनात बसवून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. तसेच, इन्स्टाग्रामवर केलेल्या कमेंटवरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचेही सांगण्यात येते. मात्र, गोलू साहू याने पोलिसांना आपल्यासोबत झालेल्या मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर पारडी पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.या हल्ल्यात जखमी झालेल्या गोलू साहू याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुलाम मोहम्मद सोहेल मोहम्मद आणि सय्यद तौसिफ सय्यद इरफान या दोघांना पारडी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पारडी पोलीस करीत आहेत.