एक कोटीहून अधिक हिंदू मतदारांची नावे गायब!

योगी आदित्यनाथांचा दावा

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
लखनौ,
Names of Hindu voters missing उत्तर प्रदेशातील मतदार याद्यांमधून एक कोटीहून अधिक हिंदू मतदारांची नावे वगळली गेल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी पात्र मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्यासाठी भाजप संघटनेला सक्रिय होण्याचे आवाहन केले. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादीची बारकाईने तपासणी करून त्यात नाव नसलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत त्यांनी यासंदर्भातील आकडेवारी मांडली.
 
 
 
ghy67878987
 
योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ६६ लाख नागरिकांची नावे पंचायत मतदार यादीत आहेत; मात्र विधानसभा मतदार यादीत त्यांचा समावेश नाही. याशिवाय सरकारी योजनांचे सुमारे ५५ लाख लाभार्थीही मतदार यादीतून गायब असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, १८ ते १९ वर्षे वयोगटातील अंदाजे ४ लाख ५० हजार तरुणांची नावेही मतदार यादीत नसल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी पक्षाने व्यापक स्तरावर प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
या कामासाठी भाजप कार्यकर्त्यांनी बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात बीएलओ यांच्याशी समन्वय साधून प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदार यादी तपासावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. पात्र असूनही यादीत नाव नसलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी मोहीम राबवण्याचे आणि या कामाचा नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही जबाबदारी केवळ बूथस्तरीय कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नसून खासदार, आमदार आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. दरम्यान, मतदार यादीतील नावांची प्रत्यक्ष पडताळणी आणि संबंधित आकडेवारीची अधिकृत पुष्टी होणे महत्त्वाचे आहे.