उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांच्या विवाहाची चर्चा

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
जम्मू,
Omar Abdullah and Nidhi Razdan जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्या विवाहाची बातमी सध्या चर्चेत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीनगरमधील हरि निवास पॅलेस येथे जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत खासगी सोहळ्यात विवाह केला. ३१ ऑक्टोबर रोजी दोघांनी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसिद्ध करून या नव्या नात्याची घोषणा केल्याचे वृत्तात म्हटले आहे. उमर अब्दुल्ला यांनी ‘एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली,’ अशा आशयाची प्रतिक्रिया दिली, तर निधी राजदान यांनी ‘इट्स डन ब्रो’ असे लिहित आनंद व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
 
 
fgt56576776878
 
उमर अब्दुल्ला यांचा यापूर्वी पायल नाथ यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, दोघे दीर्घकाळापासून विभक्त राहत होते. ३१ जुलै २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद १४२ अंतर्गत त्यांच्या सुमारे ३० वर्षांच्या वैवाहिक नात्याला कायदेशीररीत्या पूर्णविराम दिला. दोन्ही बाजूंनी परस्पर संमतीने समझोता केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. उमर अब्दुल्ला यांना पहिल्या विवाहातून दोन मुलगे आहेत. दुसरीकडे, निधी राजदान या राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरील प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदिका असून, त्यांचे यापूर्वी दिल्लीतील एका गीतकार आणि पत्रकाराशी लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांत उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांना दिल्ली हाफ मॅरेथॉन तसेच जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिल्याचेही वृत्तात नमूद आहे.
 
 
दिलेल्या माहितीनुसार, या विवाहाची नोंदणी दिल्लीतील न्यायालयात विशेष विवाह कायद्यांतर्गत करण्यात आली असून, त्यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया ऑगस्ट २०२६ मध्ये सुरू झाली होती. सप्टेंबरच्या अखेरीस आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. नोंदणीपूर्वी श्रीनगरमधील हरि निवास पॅलेस येथे दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत निकाह पार पडल्याचेही वृत्तात म्हटले आहे. विवाहानंतर ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता दिल्लीतील एका खासगी हॉटेलमध्ये स्वागत समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात जम्मू आणि अखेरीस श्रीनगर येथेही स्वागत समारंभ होणार असल्याचे वृत्तात नमूद आहे.