आपने जाहीर केली ४० उमेदवारांची पहिली यादी

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |

नवी दिल्ली,
panjab AAP Candidate Listपंजाब विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी आम आदमी पक्षाने ४० उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री भगवंतसिंग मान धुरी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.११७ सदस्यीय पंजाब विधानसभेसाठी २०२७ मध्ये निवडणूक होणार आहेत. निवडणूक अजून घोषित झालेली नसतांना आपने ४० उमेदवारांची आपली पहिली यादी शनिवारी जाहीर केली. मुख्यमंत्री भगवंत मान यांना आपने धुरी मतदारसंघातून दुसर्यांदा उमेदवारी दिली आहे.
 
fgbn
 
 
२०२२ च्या निवडणुकीत मान येथून विजयी झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष कुलतारसिंग संधवा कोटकपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोडा यांना आपने लुधियाना पश्चिममधून उमेदवारी दिली. आपने पहिल्या यादीत सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. तरणतारण, चब्बेवाल आणि लुधियाना पश्चिम या तीन मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावुी लागली होती, या पोटनिवडणुकीत आपने विजय मिळवला होता.
या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या तीनही आमदारांना आपने उमेदवारी दिली आहे. चब्बेवाल वगळता अन्य दोन मतदारसंघात विद्यमान आमदाराचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. चब्बेवाल मतदारसंघात २०२२ मध्ये काँग्रेसचे राजकुमार चब्बेवाल आप उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले होते. पण नंतर चब्बेवाल यांनी काँग्रेस आणि आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत आपने राजकुमार चब्बेवाल यांचे पुत्र डॉ. ईशांककुमार यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले होते. आपने पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.