नागपूर,
pushya-nakshatra-muhurat-2026दिवाळीच्या पृष्ठभूमीवर वही-खाते खरेदी आणि पूजनासाठी रविवार, १ नोव्हेंबर रोजी पुष्य नक्षत्राचा शुभयोग जुळून आला आहे. दिवसभर पुष्य नक्षत्र असल्याने घर, दुकान आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये वही-खाते पूजन करण्यासाठी हा दिवस शुभ आहे. तसेच वस्त्रे, अलंकार, भांडी आणि मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठीही हा योग लाभदायक असल्याचे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी सांगितले.
शास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर वही-खात्यांची खरेदी आणि पूजन केल्यास लाभदायक मानले जाते. विशेषतः व्यापारी वर्गासाठी दिवाळीच्या काळात नवीन वही-खात्यांचे पूजन करण्याला महत्त्व आहे. यंदा अश्विन कृष्ण सप्तमी, रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवसभर पुष्य नक्षत्राचा योग असल्याने खरेदीसाठी विशेष मुहूर्त उपलब्ध झाला आहे. या दिवशी सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत लाभ वेळ, सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत अमृत वेळ, दुपारी २ ते ३.३० वाजेपर्यंत शुभ वेळ आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत पुन्हा शुभ वेळ आहे. या मुहूर्तांमध्ये वही-खाते, वस्त्रे, अलंकार, भांडी तसेच अन्य मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते, असे डॉ. वैद्य यांनी नमूद केले.