अल्पवयीन मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार!

आई आणि भावाला ठार मारण्याची धमकी ; पोलिसांकडून नराधमाला अटक

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
sexual abuse ज्या जन्मदात्याने मुलीचे रक्षण करायचे, त्यानेच तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार कपिलनगर परिसरात उघडकीस आला आहे. अवघ्या १२ वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून या प्रकाराची वाच्यता केल्यास आई आणि भावाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ३५ वर्षीय पित्यावर आहे. पीडित मुलीने अखेर हिंमत एकवटून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली.

लैंगिक अत्याचार! 
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, १ जून २०२३ रोजी पीडित मुलगी १२ वर्षांची असून सहाव्या वर्गात शिकत होती. याच काळात आरोपी पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. घरात कोणीही नसताना मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपी तिच्यावर अत्याचार करीत होता. हा प्रकार जवळपास वर्षभर सुरू होता.
आई-भावाच्या जिवाच्या भीतीने सहन केला अत्याचार
अत्याचाराबाबत कोणाला सांगितल्यास आई आणि भावाला जिवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. त्यामुळे कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण होईल, या भीतीने पीडिता दीर्घकाळ गप्प राहिली. अखेर २९ ऑक्टोबर रोजी तिने कपिलनगर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासंबंधी गुन्हा दाखल केला.sexual abuse तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गतही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.