वाघाचा तातडीने बंदोबस्त करुन कुटुंबास मदत द्यावी

    दिनांक :31-Oct-2026
Total Views |
धानोरा,
tiger-should-be-dealt तालुक्यातील तुडमेल येथे शेतात धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शांताराम मडावी (26) या शेतकर्यावर वाघाने अचानक हल्ला केला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 27 ऑक्टोबर रोजी घडली होती. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी 30 रोजी तातडीने मडावी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
 
 
tiger-should-be-dealt
 
या दुर्घटनेनंतर आमदार डॉ. नरोटे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतात धानपीक उभे असून शेतीची कामे सुरू आहेत; परंतु शेतात जातानाही शेतकर्यांना जिवाची काळजी करावी लागत आहे.
 
 
कष्टाने पिकवलेले पीक वाचवताना शेतकर्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत असल्याची गंभीर दखल त्यांनी घेतली. यावेळी वनविभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून त्यांनी गावकर्यांच्या अडचणी व सुरक्षेचे प्रश्‍न आक्रमकपणे मांडले. मृत शेतकर्याच्या कुटुंबियास तातडीने आर्थिक मदत करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
 
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, विजय कुमरे, सारंग साळवे, सुभाष खोबरे, संजय कुंडू, नंदू शेंद्रे, दौलत वरखडे, हरीश माकडे, शुभम बाळेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंदोरकर, तहसीलदार गणेश माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी नामदेव बनसोड, तलाठी ज्योती ठेंगरी, दिनेश पदा आदी उपस्थित होते.