मुंबई
Vatsala Rajagopal भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘रोजा’ या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला राजगोपाल यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. त्यांच्या निधनामुळे तमिळ चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. सध्या त्यांचे पार्थिव चेन्नईतील पल्लवरम येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
वत्सला राजगोपाल यांचा जन्म १९३३ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला होता. विशेष म्हणजे, त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ या १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री मधू यांच्या आजीची भूमिका साकारली होती. मधू यांच्यासोबत अरविंद स्वामीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.
अभिनयाची आवड वत्सलाVatsala Rajagopal यांना लहानपणापासूनच होती. शालेय जीवनातच त्यांना नाटक आणि नृत्याची गोडी लागली होती. मात्र, अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी चेन्नईमध्ये अकाउंटंट जनरल यांच्या कार्यालयात क्लर्क म्हणून काम केले होते. नोकरी सांभाळल्यानंतर वयाच्या साठीनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली.‘रोजा’व्यतिरिक्त वत्सला यांनी ‘धाम धूम’, ‘मोझी’, ‘साथी लीलावती’, ‘रिदम’, ‘विनर’, ‘अनियन’, ‘पट्टियल’ आणि ‘कल्याण समायल सादम’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. तीन दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ४०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. या प्रवासात त्यांना अनेक नामवंत अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही वत्सला राजगोपाल यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘चिथी’, ‘आनंदम’, ‘कधई नेरम’, ‘मुंधनाई मुदिचु’, ‘आडूगिरेन कन्नन’, ‘कधाल पगडई’, ‘मगल’ आणि ‘वसंतम’ यांसारख्या मालिकांमध्ये त्या दिसल्या होत्या. चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा दोन्ही माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वातील एका अनुभवी अभिनेत्रीला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.