तालुक्यातील तलावामध्ये अत्यल्प पाणीसाठा

येणारा काळ पाणी संकटाचा

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
मानोरा,
critically-low-water-levels तालुक्यातील लघुसिंचन तलावात अत्यल्प २० ते ३० टक्के पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामाच्या ओलीतासाठीही पाणी मिळणार नाही. तसेच तलावात टाकलेले मासोळीचे बियाणे पक्षी फस्त करत असल्यामुळे मच्छीमारावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. तसेच जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
 
critically-low-water-levels
 
तालुक्यात लघु पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषदेचे जवळपास २५ लघुसिचंन तलाव असून, यावर्षी पावसाच्या दीर्घ खंडामुळे तालुक्यातील सिंचन तलावात २० ते ३० टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणार्‍या काळात शेतकर्‍यांसह शेतमजुराना सुद्धा दुष्काळाच्या झळा बसणार आहे. तालुक्यातील शेतकर्‍याना रब्बी हंगामास पुर्णपणे मुकावे लागणार असल्यामुळे शेत मजुराला काममिळणार नाही. त्यामुळे त्यांना चरीतार्थ चालवणे कठीण होणार आहे. तर सिंचन तलावामध्ये मंछीमार संस्था जुलै महिन्यात मच्छी बीज सोडतात मात्र, ऑगष्ट व सप्टेंबर महिना पुर्णपणे कोरडा गेल्यामुळे सिंचन तलावात २० ते ३० टक्के पाणीसाठा असल्यामुळे मासेमारीवरही त्याचा गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे मंछीमारावर उपासमारी ओढवणार आहे. सिंचन तलावात मोजकेच पाणी उपलब्ध असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न गंभीर निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा उपव्यय टाळून काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन प्रशासन करीत आहे.