वाशीम,
dr-vishal-somatkar मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाशीम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. विशाल सोमटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण हा निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम असून, मतदार यादीतील पात्र मतदारांची नावे कायम राहणे, अपात्र अथवा दुबार नोंदींची पडताळणी होणे तसेच नागरिकांना मतदार यादीशी संबंधित आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळणे, या दृष्टीने समन्वयकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. वाशीम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघात या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी डॉ. सोमटकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात सक्रिय असलेल्या डॉ. सोमटकर यांच्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी ते प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला. तर निवडी संदर्भात बोलताना डॉ. विशाल सोमटकर यांनी या निवडीचे श्रेय चंद्रकांत ठाकरे यांना दिल्याचे सांगितले.