पाकिस्तानच्या घुसखोरीला भारताचा थेट इशारा!

साद वराइच यांना पाचारण

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India's direct warning against Pakistan's सीमेपलीकडून होणाऱ्या बेकायदेशीर घुसखोरीला पाकिस्तानकडून सातत्याने मदत मिळत असल्याच्या मुद्द्यावर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी भारताने पाकिस्तान उच्चायोगाचे प्रभारी साद वराइच यांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला. पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगाचे प्रभारी राजदूत यांना पाचारण केल्यानंतर काही तासांतच भारताकडून ही कारवाई करण्यात आली.पाकिस्तानने यापूर्वी भारतीय राजदूतांना बोलावून पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली होती. या कारवाईत दोन जण ठार झाले होते. हे दोघे सामान्य नागरिक असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र, भारताने हा दावा फेटाळून लावत सीमापार घुसखोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित गंभीर बाब असल्याचे स्पष्ट केले.
 
 

nako 
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर BSF जवानांनी दोन संशयित पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारींना पाचारण करून पाकिस्तानकडून सीमापार बेकायदेशीर घुसखोरीला मिळणाऱ्या कथित सातत्यपूर्ण मदतीबाबत भारताचा निषेध नोंदवला.परराष्ट्र मंत्रालयाने 2 ऑक्टोबर रोजी पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घडलेल्या घटनेबाबत पाकिस्तानकडून करण्यात आलेले आरोप निराधार आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तीन जण भारतीय हद्दीत घुसले होते. BSF जवानांनी त्यांना पाकिस्तानच्या दिशेने परत जाण्याच्या अनेकदा सूचना दिल्या. मात्र, या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ते सीमा कुंपणाच्या दिशेने पुढे जात राहिले.
 
 
या तिघांकडून तातडीचा सुरक्षा धोका निर्माण झाल्याने BSFला त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागली, असे भारताने पाकिस्तानला स्पष्ट केले. या घटनेत पाकिस्तानातून सक्रियपणे कार्यरत असलेल्या सशस्त्र अमली पदार्थ तस्करांच्या टोळ्यांकडून वारंवार सीमापार हालचाली होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.भारताने पाकिस्तान सरकारला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. सीमापार घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी तसेच या कारवायांमध्ये पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या कथित सहभागाची तपासणी करून आवश्यक सुधारात्मक उपाययोजना करण्याची मागणी भारताने केली. याशिवाय, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेच्या पावित्र्याचा आदर करावा आणि संबंधित द्विपक्षीय करारांचे काटेकोरपणे पालन करावे, असे भारताने स्पष्ट केले. आपल्या हद्दीतून होणारी अनधिकृत हालचाल रोखण्यासाठी सुरक्षा दलांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी ठोस पावले उचलावीत, अशीही भारताची भूमिका आहे.