गॅस पाइपलाईनला गळती;सतर्कतेने नुकसान टळले

रामजन्मभूमी ट्रस्टच्या सुरक्षा प्रभारीची माहिती

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
अयोध्या,
LPG gas leak in ayodyaअयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात अचानक सुरू झालेल्या गॅस गळतीने एकच घबराट पसरली. खबरदारीचा उपाय आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रामललासह परिसरातील सर्व मंदिरांमधील दर्शन जवळपास पाऊण तास थांबवण्यात आले. कंपनीच्या तंत्रज्ञांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, पाईपलाईन बदलून गॅस गळती रोखल्याने अनर्थ टळला.
 
 
ayodhya
ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी कॅप्टन के. के. तिवारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, शुक्रवारी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास श्रीराम मंदिराच्या उत्तर-पश्चिम दिशेला असलेल्या संरक्षक भिंतीबाहेरून जाणारी पीएनजी गॅसची पाइपलाईनला गशती सुरू झाली. तंत्रज्ञांनी तातडीने गळती थांबविल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले. या घटनेत कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव दर्शन रोखण्यात आले होते. मंदिर परिसरात अचानक गॅसचा तीव्र वास येऊ लागला.
 
 
सुरक्षारक्षकांनी तत्काळ तपास सुरू केला असता कुबेर टिल्लाकडे जाणाऱ्या मार्गाजवळ जेसीबीने खोदकाम सुरू असताना गॅसची पाइपलाईन फुटल्याचे निदर्शनास आले. ही पाइपलाईन ‘ग्रीन गॅस लिमिटेड’ची आहे. या पाइपलाइनद्वारे, राम मंदिरातील ‘सीता रसोई’मध्ये रामललांचा प्रसाद बनवण्यासाठी पीएनजीचा पुरवठा केला जातो. गॅस गळतीची माहिती मिळताच प्रशासनाने दर्शन तात्पुरते थांबले. कंपनीच्या तंत्रज्ञांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, पाईपलाईन बदलून गॅस गळती रोखली.