नागपूर,
Mahatma Gandhi Jayanti महात्मा गांधी जयंती निमित्त देवग्राम येथे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसराची स्वच्छता करून विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.
या उपक्रमासाठी प्रा. डॉ. भाऊसाहेब भोगे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मागील वर्षी आणि यंदा स्वतःच्या खर्चातून अडीच ते तीन लाख रुपयांची वृक्ष उपलब्ध करून देत गावाच्या विकासात योगदान दिले.‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि आदर्श गाव’ निर्माण करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. एकजूट आणि लोकसहभागातून देवग्रामच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार करण्यात आला.
सौजन्य:तेजेंद्र गिरडे,संपर्क मित्र