शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाताना वाटेतच काळाचा घाला

रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

    दिनांक :04-Oct-2026
Total Views |
लखनऊ
accident उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अत्यंत हृदयद्रावक अपघाताची घटना घडली. लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानाचे पार्थिव विमानाने आणल्यानंतर त्याच्या मूळ गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेतून प्रवास सुरू होता. मात्र, पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर या रुग्णवाहिकेची उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
 

martyr-soldier-body-ambulance-accident-purvanchal-expressway-4-killed 
धडक इतकी तीव्र होती की रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून रुग्णवाहिकेत अडकलेले मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, अपघात accident  नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तसेच एक्स्प्रेसवेवर उभा असलेला ट्रक कोणाचा होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जात असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.