रशिया
ukraine russia war रशिया-युक्रेन युद्धादरम्यान रशियाने युक्रेनवरील ड्रोन हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सुमी शहरातील औषधनिर्मिती कारखान्यावर रशियन ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, हा कारखाना भारतीय औषधनिर्मिती कंपनी ‘कुसुम हेल्थकेअर’चा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
जेलेंस्की यांनी या हल्ल्याचा निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. रशियाने कीवमधील ‘पिवनिचनी ब्रिज’ आणि निप्रोमधील एका दळणवळण सुविधेलाही लक्ष्य केल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यांमध्ये अनेक जण जखमी झाल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या आठवड्यात ukraine russia war रशियाने युक्रेनवर १,९०० हून अधिक ड्रोन, १,७०० हवाई बॉम्ब आणि २५ क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केल्याचे जेलेंस्की यांनी सांगितले. यापैकी ८०० हून अधिक ड्रोन जेट इंजिनवर आधारित असल्याचेही त्यांनी नमूद केले.जेलेंस्की यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, एका रात्रीत रशियाने युक्रेनवर १३५ हल्लेखोर ड्रोन सोडले. त्यापैकी ५० हून अधिक ड्रोन जेट इंजिनवर आधारित होते. कीव, निप्रो, खार्किव, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझ्झिया या भागांना या हल्ल्यांचा फटका बसला. निवासी इमारती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना रशियन सैन्याकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी युक्रेनला भेट देऊन जेलेंस्की यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर युरोपकडून युक्रेनला मिळणारा पाठिंबा पुन्हा अधोरेखित झाला आहे. रशियाची ‘युद्धयंत्रणा’ भविष्यात इतर युरोपीय देशांविरोधातही वापरली जाऊ शकते, असा इशारा मर्ज यांनी दिला. युक्रेनला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.रशियन ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी युक्रेनने अधिक अत्याधुनिक इंटरसेप्टरची मागणी केली आहे. बर्लिन आणि कीव यांच्यात एक अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिकच्या लष्करी मदत पॅकेजवर करार होण्याची श