वाशीम,
sanskar-bharati येथील वाटाणे लॉन्स येथे आयोजित संस्कार भारतीचे सर्वसाधारण बैठकीदरम्यान ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वंद्य वंदे मातरम देशभक्तीपर गीतांचा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये संस्कार भारतीच्या विदर्भातील विविध शाखांच्या सभासदांनी सागरा प्राण तळमळला, चंदन हे देश कि माटी, मेरे देश की धरती, रंग दे बसंती चोला शेवटी वंदे मातरम या गीतांसह नृत्य तसेच पोवाड्याद्वारे अफजलखानाचा वध ही नाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्कार भारतीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष कांचन गडकरी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ओजस भाई हिराणी, चंद्रकांत घरोटे, सुधाकर आंबुसकर, विवेक कवठेकर, अॅड. अभय घुडे, अॅड. श्रीराम काळू उपस्थित होते. नटराज पूजनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संस्कार भारतीचे अध्यक्ष अभय घुडे यांनी केले. यावेळी प्रांतमंत्री विवेक कवठेकर म्हणाले की, भारतीय ललित कलांचे संवर्धन करून संस्कार करणे व देशातील नागरिकांना संस्कारित करणे हे संस्कार भारतीचे कार्य आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये कांचनताई गडकरी म्हणाल्या की राष्ट्रमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर सिंधुताई सपकाळ यांना कुटुंबातील संस्कारातून दैवी शक्ती प्राप्त झाली होती. त्या दैवी शक्तीच्या आधारावर या मातांनी अजरामर कार्य केले. आपली भाषा, भूषा, भुवन, भोजन व भ्रमण या पाच गोष्टी मुलांवर संस्कारित करणे आवश्यक आहे, हे उदाहरणासह त्यांनी स्पष्ट केले. आपले सण उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करून कुटुंब संस्कारित करण्याचे कार्य मातांनी केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुनीता खानगाई यांनी केले. कार्यक्रमा नगरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.