पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या भावाने मारली बाजी!

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
 
देवळी,
-soybean-rateदेवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती मनोज वसू यांच्या उपस्थितीत सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला. खरेदीच्या पहिल्याच दिवशी बाजार समितीत सोयाबीनला ६ हजार ४८५ रुपये भाव मिळाला. पहिल्याच दिवशी तब्बल ८०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकर्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
 
 
soyabean
 
यावेळी बाजार समितीचे संचालक अरविंद वानखडे, हरीश ओझा यांच्यासह कर्मचारी, मापारी, व्यापारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, बाजार समितीत सोयाबीन ला चांगला भाव मिळत असून सोयाबीनला ६४८५ रुपये भाव मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.