चिमुकल्या आदिवची इंडिया बुक ऑफ 2026 मध्ये नोंद

20 मिनिटे 2 सेकंदांत 677 ‘कार्टव्हील्स’चा विक्रम

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
राजुरा ,
adiv-doke-cartwheels-recordगडचांदूर शहरातील सहा वर्षीय आदिव डोके याने अवघ्या 20 मिनिटे 2 सेकंदांत हातावर तोल सावरत तब्बल 677 गोल गुलाटी मारण्याचा विक्रम साधला आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची 22 ऑगस्ट रोजी इंडिया बुक ऑफ 2026 मध्ये अधिकृत नोंद झाली आहे.
 

records 
 
आदिवच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आदिव डोके याचा भेटवस्तू, कुंडी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अरुणा सालवटकर, किरण अहिरकर, सुलभा कुरेकर, रंजना पवार, डॉ. विकास डोके, डॉ. स्नेहल डोके, सावी डोके यांची उपस्थिती होती. आदिवच्या या उज्ज्वल यशाबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दीपक भवर, महासचिव आशिया रीजवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महिला अध्यक्ष डॉ. प्रीती तोटावार, नागपूर विभाग अध्यक्ष विजय जांभूळकर, सचिव पंडित काळे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.