'या' स्पर्धेसाठी भुवीच्या खांद्यावर टीम इंडियाची कमान!

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
bhuvneshwar kumar captain of team indiaभारतीय क्रिकेट संघातून सातत्याने बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारवर अचानक एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली अनेक नामांकित खेळाडू खेळताना दिसतील.
 
 
bhuvi
३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी भुवनेश्वरची नियुक्ती करण्यात आली आहे. भुवनेश्वर बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. मात्र, तो आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघात पुनरागमन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळतो आणि संघाला दोन विजेतेपदे मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
 
भुवनेश्वर व्यतिरिक्त, या संघात आयपीएलमध्ये चमकलेले इतर अनेक खेळाडू असतील. या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात कृणाल पांड्या, शशांक सिंग, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि टी. नटराजन यांचा समावेश आहे. शशांक वगळता संघातील उर्वरित खेळाडू यापूर्वी टीम इंडियाकडून खेळले आहेत. या स्पर्धेत प्रत्येक संघात फक्त सहा खेळाडू असतात आणि ही स्पर्धा खूपच रोमांचक मानली जाते.