शिवसेना नगरसेवक सागर भारुकावर खंडणी, धमकी, मारहाणीचा गुन्हा

हॉटेल व्यवसायिकाला मारहाण प्रकरणी पोलिसांनी घेतले ताब्यात:आज न्यायालयात करणार हजर

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
अकोला,
sagar bharuk महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक सागर सुभाषचंद्र भारुका यांच्यावर हॉटेल व्यावसायिकाला १५ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून मारहाण, खंडणी व धमकीचा सिव्हिल लाईन पोलिसात रविवारी,४ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून सिव्हिल लाईन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी न्यायालयासमोर भारुकाला हजर करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळासह हॉटेल व्यवसायांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

sagar bharukawar 
 
 
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यवर्ती बस स्थानक जवळ कृष्णा एम्पोरियल हॉटेलमध्ये नगरसेवक भारुका शनिवारी उद्या रात्री सव्वा बाराच्या सुमारास मित्रांसह जेवणासाठी गेले असता या ठिकाणी हॉटेल चालू ठेवण्यासाठी १५ लाखांची मागणी केली.यावरून कॅशियरशी शाब्दिक वाद घातला.वादाचे मारहाणीत रूपांतर झाले.sagar bharuk याप्रकरणी हॉटेल कॅशियर शोएब जमील अख्तर यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक भारुका यांच्यावर रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली असून भारुकाची आरोग्य तपासणी करण्यात आली असून पोलिस सोमवारी न्यायालयात हजर करणार आहेत.