क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!

डोक्याच्या वरून Wide Ball टाकला अन् गेला सिक्स

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
ओटावा
cricket गेल्या दोन दशकात क्रिकेटचा चेहरा बदलला आहे, कधी काळी टेस्ट क्रिकेटसाठी ओळखलं जाणारं क्रिकेट आता टी-ट्वेंटीचा फॉरमॅट झालाय. देशांतर्गत होणाऱ्या लीग स्पर्धेमुळे टी-ट्वेंटी क्रिकेटला वाव मिळाला अन् आता जगभरात अनेक लीग मॅचेच पहायला मिळतात. अशातच आता कॅनडाच्या प्रीमियर टी-10 क्रिकेट लीगच्या सेमी फायनल मॅचदरम्यान एक अतिशय विचित्र आणि दुर्मिळ प्रकार पाहायला मिळाला. क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.

wide ball
 
इनिंगच्या 9 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?
टोरंटो सिक्सर्स आणि मिसिसॉगा मास्टर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या महत्त्वाच्या मॅचमध्ये मैदानावर उपस्थित असलेले खेळाडू, कॉमेंटेटर्स आणि प्रेक्षक सर्वच जण काही काळासाठी पुरते चकित झाले. युएसएचा फास्ट बॉलर अली खान याच्या एका बॉलवर ही संपूर्ण घटना घडली. टोरंटो सिक्सर्सच्या इनिंगच्या 9 व्या ओव्हरमध्ये अली खान बॉलिंग करत असताना त्याने पोलार्डला एक बाउन्सर टाकला. हा बॉल बॅटर आणि विकेटकीपर दोघांच्याही वरून थेट बाउंड्री लाईनपार जात स्टँड्समध्ये पडला. त्यानंतर अंपायरने अजब निर्णय घेतला.
MCC चा 19.7 नियम काय सांगतो?
बॉल थेट स्टँड्समध्ये गेल्यामुळे कॉमेंटेटर्सना वाटले की टोरंटोला वाईड आणि सिक्स असे मिळून 7 रन मिळतील. मात्र, अंपायरने टोरंटोला केवळ 5 रन दिले. क्रिकेटमधील MCC नियमांनुसार, जेव्हा बॉल बॅटला लागून बाउंड्री लाईनपार जातो, तेव्हाच सिक्स दिला जातो. नियमावलीतील लॉ 19.7 नुसार, जर बॉल बॅटला न लागता बाउंड्री लाईनपार गेला, तर त्याला फोर मानले जाते. हा बॉल वाईड असल्यामुळे वाईडचा 1 पेनल्टी रन आणि फोरचे 4 रन असे एकूण 5 रन टोरंटो सिक्सर्सच्या स्कोरबोर्डमध्ये जमा केले गेले.
दरम्यान, मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करताना टोरंटो सिक्सर्सने 10 ओव्हरमध्ये 130/4 असा विशाल स्कोअर उभारला होता. टोरंटोच्या या इनिंगमध्ये कायरन पोलार्डने अवघ्या 16 बॉलमध्ये 40 रनची आक्रमक इनिंग खेळली. मिसिसॉगा मास्टर्सकडून ॲलेक्स लीसने 11 बॉलमध्ये 39 रन ठोकून जोरदार लढा दिला, पण त्यांना टार्गेट पूर्ण करता आले नाही. टोरंटोने मिसिसॉगाचा 9 रनने पराभव करत थेट फायनलमध्ये धडक मारली.