मोठी बातमी! हेल्थ इन्शुरन्स असूनही उपचारांसाठी खिशातून पैसे भरावे लागणार?

काय सांगतो नवा नियम

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली
health insurance हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्या असंख्य ग्राहकांसाठी येत्या दिवसात महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. रिटेल हेल्थ इन्शुरनस् पॉलिसींमध्ये तब्बल 10 टक्के को-पेमेंट लागू करण्याचा प्रस्ताव सध्या विचारात आहे. हा बदल लागू झाल्यास रुग्णालयातील उपचारांचा पात्र असलेला खर्च हा मंजूर झाल्यानंतर त्यातील काही रक्कम ही ग्राहकाला स्वत:च्या खिशातून भरावी लागू शकते.

health insurance
हेल्थ इन्शुरन्सच्या नेमका काय होणार बदल?
मिळालेल्या माहितीनुसार, उपचाराच्या खर्चापैंकी 10 टक्के हिस्सा हा ग्राहकाकडून घेण्याची तरतूद असू शकते. मात्र, एका क्लेमसाठी ग्राहकाने भराण्याची कमाल रक्कम ही 5 लाख रुपयांपर्यत मर्यादित ठेवण्याचा विचार आहे. या बदलामुळे ग्राहकांना तुलनेने कमी वार्षिक प्रीमियमचा पर्याय मिळवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॅशलेस तसेच रिइम्बर्समेंट,दोन्ही प्रकारच्या क्लेममध्ये ही को-पेमेंटची अट लागू होऊ शकते. आजारावरील उपचारांसोबत अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्यात होणारा खर्चाचाही त्यात समावेश होऊ शकतो. मात्र , ओपीडी खर्चासाठी ग्राहकांना स्वत:च खर्च करावा लागू शकतो.
या प्रस्तावामधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 टक्के को-पेमेंटची अट बदलता किंवा राइडरद्वारे हटवता येणार नाही, अशी शक्यता आहे. शिवाय हा हिस्सा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधून भरता येणार नसल्याचाही प्रस्ताव आहे.
दरम्यान, ग्राहकांना कमी प्रीमियमची को-पेमेंट पॉलिसी किंवा अधिक प्रीमियम धरुन पूर्ण उपचार खर्च ही कव्हर करणारी पॉलिसी, असे 2 पर्याय उपलब्ध करुन द्यावेत, अशी तज्ज्ञांची भूमिका आहे. या प्रस्तावामुळे रुग्णालयांकडून होत असलेल्या अनावश्यक तपासण्या, अतिरिक्त प्रक्रिया, अनावश्यक दिवस रुग्णालयात ठेवण्यासही आळा बसू शकतो. मात्र,अंतिम निर्णय झाल्यानंतरच या नियमांचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.