एक घटना आणि अख्ख उभ गाव जळालं

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
जळगाव
jalgaon chalisgaon clash चाळीसगाव तालुक्यातील लोंणजे गावात महिलेच्या छेडछाडीच्या कथित प्रकारावरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिलन सोनवणे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणात दहा जणांना अटक केली आहे. यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आता हत्येचे कलम वाढवण्यात आले आहे.
 

jalgaon chalisgaon clash woman molestation dispute leaves one dead, 10 arrested 
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या छेडछाडीच्या मुद्द्यावरून लोंणजे गावात दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर बाचाबाची वाढत गेली आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. दोन्ही गटांतील व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांचा वापर करत एकमेकांवर हल्ला केला.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. व्हिडीओमध्ये गावात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे आणि दोन्ही गट एकमेकांवर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे.या मारामारीत मिलन सोनवणे गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात हत्येचे कलम समाविष्ट केले आहे.घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे पथक लोंणजे गावात पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरुवातीला या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.चाळीसगावचे डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे लोंणजे गावासह परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.