नवी दिल्ली
indigo ticket prices to rise विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडिगोने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांवरील इंधन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान इंधनांच्या वाढत्या किमतीचा परिणाम म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्रीनंतर होणाèया नवीन बुकिंगसाठी सुधारित इंधन शुल्क लागू होईल. त्यानंतर विमानाचे तिकीट बुक करणाèया प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
एटीएफच्या किमतीत वाढ
गेल्या काही दिवसात विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. त्याचा थेट परिणाम जेट फ्यूएलच्या किमतीवरही झाला आहे.
नवीन शुल्क केवळ 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर होणाèया नवीन बुकिंगला लागू होणार आहे. त्यामुळे आधीच बुक केलेल्या तिकिटांवर या नव्या शुल्काचा परिणाम होणार नाही.