परंपरा बाय राजन्याचा सोहळा उत्साहात

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
नागपूर,
MLA Krupal Tumane परंपरा, संस्कृती आणि आधुनिक फॅशनचा सुरेख मिलाफ घडवून आणणारा ‘परंपरा बाय राजन्या’ हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भारतीय पारंपरिक संस्कृतीला आधुनिक फॅशनची जोड देत साकारलेल्या या कार्यक्रमाला मान्यवरांसह फॅशनप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने तसेच नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मनोज घोडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.

sunilt
 
 
Tradition | Style | Elegance’ या संकल्पनेवर आधारित या सोहळ्यात भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सौंदर्य, कलात्मकता आणि वैभवाचे दर्शन घडविण्यात आले. पारंपरिक कलाकुसर, भारतीय सौंदर्यशैली आणि आधुनिक फॅशनचे आकर्षक सादरीकरण रसिकांच्या पसंतीस उतरले.उपस्थित मान्यवर व रसिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आयोजकांनी सर्व मान्यवर, पाहुणे, सहकारी आणि रसिकांचे आभार मानले.
सौजन्य:सुनील तांदुळकर ,संपर्क मित्र