हिंदीच्या प्रयोजन पैलूवर विचार गरजेचा : प्रा. सूर्यप्रसाद दीक्षित

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
नागपूर ,
Nagpur University Hindi Department स्पर्धेच्या युगात हिंदीच्या प्रयोजन पैलूंचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. हिंदीमध्ये रोजगाराच्या विविध संधी असून देश-विदेशातील मोठा बाजार तिच्याशी जोडलेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हिंदी विद्वान प्रा. सूर्यप्रसाद दीक्षित यांनी केले.
 
 
lkhesh2
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत हो ते. पत्रकारिता, व्यापार, जाहिरात, संवाद यांसारख्या क्षेत्रांत हिंदी भाषा तज्ज्ञांची मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदीची सहजता, सर्जनशीलता आणि संप्रेषणक्षमता हीच तिची प्रमुख शक्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पाण्डेय, बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठाचे प्रा. डॉ. बलजीत श्रीवास्तव उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जागृती सिंह यांनी केले, तर आभार डॉ. लखेश चंद्रवंशी यांनी मानले.
सौजन्य: डॉ. लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र