मत्स्य व्यावसायिक बांधवांना अधिकाधिक मदत मिळवून देणार : ना. नितेश राणे

दुष्काळ सदृश परिस्थितीच्या ना. राणे यांनी घेतला आढावा

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
वाशीम,
nitesh rane दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय व तलावातील पाणीसाठा कमी असून, मत्स्य व्यवसायापुढे संकट निर्माण झाले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा असून त्यानुसार प्रत्येक नुकसानाची नोंद घेऊन मत्स्य व्यावसायिक बांधवांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, ६ ऑटोबर रोजी वाशीम येथे केले. दुष्काळ सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक राणे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या सहभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते.
 

nitesh rane assures support for fishermen amid drought-like situation in washim 
या आढावा बैठकीला आमदार भावना गवळी, आमदार सई डहाके, आमदार श्याम खोडे, मु‘य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त भानूदास पालवे, प्रादेशिक उपायुक्त सु.वा.जांभुळे, सहायक आयुक्त प्रियंका झोड आदी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मासे उत्पादनात मोठी घट होणार आहे. मत्स्य व्यवसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. जलाशयांमध्ये गाळ साचल्याने त्यांची क्षमता कमी होते. त्यामुळे जलाशयांमधील गाळ काढण्यासाठी राज्यव्यापी कार्यक‘म राबविण्यात येईल. जलाशयातील शेतीसाठी वापरता येणार आहे व जलाशये मोकळी झाल्यामुळे भविष्यात साठवण क्षमता वाढणार आहे. संबंधित यंत्रणांनी यासंबंधीचे प्रस्ताव दोन आठवड्यात शासनाकडे परिपूर्ण करून पाठवावेत असे निर्देशही त्यांनी दिले.
 
 
मु‘यमंत्री मत्स्य संपदा योजनेत जिल्ह्यात अत्यल्प प्रकरणे मंजूर झाल्याचे दिसते. अनेक प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे. बँकांनी केवळ तांत्रिक कारणास्तव प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. सध्या दुष्काळाची स्थिती आहे याची जाण ठेवून अशा काळात लोकांना अधिकाधिक मदत केली पाहिजे. प्रशासनाने मासेमारी बांधवांच्या अडचणी संवेदनशीलपणे सोडवाव्यात. वाशीम मालेगावमधील फिश मार्केट प्रस्तावाचा पाठपुरावा करून पुढची प्रकि‘या पूर्ण करून घ्यावी. जिल्हा नियोजन निधीतून मत्स्य व्यवसाय विकासासाठी वापरावयाचा निधी निश्चित आहे. त्यासाठी कार्यालयाने प्रस्ताव द्यावेत. शासनाकडून आवश्यक मान्यता मिळवून देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 
 
ना. राणे यांनी ग‘ाम काजळंबा व धामणी खडी येथील जलाशयांची पाहणी करून मत्स्य व्यावसायिक बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जलाशयांमध्ये पाणी नसल्याने मत्स्य व्यवसायाला अडचणी आल्या आहेत. दुसरे उपजीविकेचे साधन नाही. मत्स्यबीज बोटुकली मिळत नाही आधी अडचणी मत्स्य व्यावसायिक बांधवांनी यावेळी मांडल्या. बँकांनी मच्छी व्यवसायिकांची अडवणूक करता कामा नये. दुष्काळाच्या स्थितीत अधिक संवेदनशीलतेने कुठलीही तांत्रिक कारणे पुढे न करता अधिकाधिक सहकार्य करावे. त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयांनी योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा. मु‘यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अनेक विविध लाभ लागू आहेत त्यासाठी अधिकाधिक मासेमार बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी जलसंधारण, पाटबंधारे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.