नागपूर,
Pitru Paksha 2026 पितृपक्षानिमित्त माजी वायुसैनिक कल्याण संघटना (ईवान), नागपूरच्या वतीने अनामवीर सैनिकांसाठी तर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अमर जवान स्मारक, अजनी येथे हा कार्यक्रम झाला.
सियाचिनसह देशाच्या सीमेचे रक्षण करताना प्रतिकूल परिस्थितीत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या तसेच युद्धात बेपत्ता झालेल्या आणि ज्यांचे पार्थिवही मिळू शकले नाही, अशा अनामवीरांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. गुरुजी श्री. चंद्रशेखर चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत तर्पण अर्पण करून वीरांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.ईवानचे कार्याध्यक्ष महेश अंबोकर, सचिव अजय गाढवे, ब्रिगेडियर सुनील गावपांडे (निवृत्त) यांच्यासह पदाधिकारी, माजी सैनिक व अजनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईवानतर्फे गेल्या सात वर्षांपासून पितृपक्षात हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे.
सौजन्य:अजय गाढवे ,संपर्क मित्र