सर्वोच्य न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवला फटकारले

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
मुंबई,
Rajpal Yadav Supreme Courtचेक बाउन्सच्या सात प्रकरणांत दोषी ठरलेल्या अभिनेता राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले. न्यायालयाच्या आदेशानंतरही पाच कोटी रुपये जमा न केल्याने न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची नाराज झाले. या अहंकाराला योग्य जागा दाखवावी लागेल. कधी तोंड उघडायचे, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तुमची जागा तुरुंगात आहे, असे ते म्हणाले.
 
 
actor
सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादवला शेवटची संधी देत मंगळवारपर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजीही त्यांना पैसे भरण्यासाठी वेळ दिला होता. सुनावणीवेळी यादव यांच्या वकिलांनी ५० लाख रुपयांच्या डिमांड ड्राफ्टची प्रत सादर केली. तसेच यावर बँक प्रक्रिया करत असल्योही सांगितले.
 
 
ते गरीब नाहीत, असे यादव यांच्या वकिलांनी म्हटले. ते कदाचित तुमच्यापेक्षा श्रीमंत असतील, पण ज्या प्रमाणात तुम्ही त्यांची फसवणूक केली आहे, त्या अर्थाने ते गरीब ठरतात. या अहंकाराला योग्य जागा दाखवणे गरजेचे आहे. कधी बोलावे याचे भान तुम्हाला असायला हवे. तुमची जागा तुरुंगात आहे, असे न्यायमूर्ती बागची यांनी कडक शब्दांत सुनावले. तसेच न्यायालयाने उद्यापर्यंत पैसे भरण्याचे निर्देश दिले आणि हे प्रकरण उद्याच्या सुनावणीसाठी पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे.