सुगंधा लातूरकर यांच्या गायनाने रंगली संगीतसभा

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
नागपूर,
Sanskar Bharati, Nagpur कै. विमलताई पत्की यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कार भारती, नागपूरच्या वतीने सुप्रसिद्ध गायिका सुगंधा लातूरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम पांडे लेआउट येथील स्व. दत्ताजी डिडोळकर भवनातील संस्कार भारती सभागृहात झाला.
 
 
sanjay
 
 
डॉ. दीपक खिरवडकर, किरण पत्की आणि संस्कार भारतीचे अध्यक्ष वीरेंद्र चांडक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राग श्याम कल्याणमधील बंदिशींनी मैफिलीला प्रारंभ करत लातूरकर यांनी राग दुर्गा आणि गौड मल्हारमधील सुरेल रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली. भैरवीतील अभंग व भजनाने मैफिलीची सांगता झाली.त्यांना तबल्यावर राम ढोक, हार्मोनियमवर नरेंद्र कडवे आणि तानपुऱ्यावर स्नेहल रानडे यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन डॉ. अभिजित बोरीकर यांनी केले. यावेळी श्याम देशपांडे, आशुतोष अडोणी, मनोज श्रोती, गजानन रानडे यांच्यासह पत्की कुटुंबीय आणि संगीतप्रेमी उपस्थित होते. सुरेल सादरीकरणामुळे ही संगीतसभा रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.
सौजन्य:संजय भुसारी ,संपर्क मित्र