नागपूर,
Sanskrit Bharati Nagpur संस्कृत लेखनातील शुद्धता, अचूकता आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने संस्कृतभारती नागपूर महानगरच्या प्रशिक्षण विभागातर्फे ‘लेखनाभ्यासः’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले. दत्ताजी डिडोळकर स्मृतीभवन येथील संस्कृतभारती प्रांतकार्यालयात झालेल्या या उपक्रमाला संस्कृत विद्यार्थी व अभ्यासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागपूर महानगर प्रशिक्षणप्रमुखा अश्विनी देशपांडे यांनी सहभागींचे मार्गदर्शन केले. अनुस्वार, विसर्ग, हलन्त, ह्रस्व-दीर्घ, ‘न’ व ‘ण’ यांचा योग्य वापर, रफार तसेच संधीमुळे होणारे लेखन याबाबत उदाहरणांसह माहिती देण्यात आली.वाक्यलेखन, मराठी वाक्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर, चित्रावरून लेखन आणि लेखनातील चुका शोधून दुरुस्ती अशा विविध कृतींच्या माध्यमातून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. ‘ऐका, समजा, लिहा आणि स्वतःच्या चुका स्वतः शोधा’ या कृतीशील पद्धतीमुळे सहभागींचा संस्कृत लेखनावरील आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
सौजन्य: रश्मी मदनकर,संपर्क मित्र