बँकॉक,
thailand floodथायलंडमध्ये मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. पूर आणि घरांच्या पडझडीत आतापर्यंत ४२ लोकांचा मृत्यू झाला असून, ३५ लाखांहून अधिक लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे.
आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बँकॉकमध्ये पूर आला असून, रस्ते आणि परिसर पाण्याखाली गेले आहेत. गाड्या पाण्यात अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे, सुपरमार्केट आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातत्याने पूरग्रस्त परिस्थितीमुळे बँकॉकला आपत्तिग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. अनेक भागांतील शाळा बंद असून, कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुरामुळे बँकॉक विमानतळांवरील उड्डाणसेवा स्थगित करण्यात आली.
थाई हवामान विभागाने इशारा दिला आहे की, बुधवारपर्यंत उत्तर थायलंडच्या बहुतांश भागात वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अचानक पूर येण्याचा धोका वाढेल. बँकॉकसह मध्य, पूर्व आणि दक्षिण भागांतील काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता आहे.